मंडणगडातील तिडे-तळेघर गाव सील ; ४० व्यक्ती क्कारंन्टाईन...

Seal Tide Taleghar villages in Mandangad 40 persons quarantine
Seal Tide Taleghar villages in Mandangad 40 persons quarantine

मंडणगड (रत्नागिरी) : मंडणगड तालुक्यात पहिला कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने यंत्रणा सतर्कतेने कामाला लागली असून तिडे-तळेघर गावे प्रवेशबंदी करून सील करण्यात आली आहेत. तर या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या ४० व्यक्तींना क्कारंन्टाईन करून देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यातील 17 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

 मंडणगड तालुक्यात इन्स्टिट्यूशनल क्कारंन्टाईन करण्यात आलेल्या 25 जणांचे स्वब मिरज येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. यातील 20 जणाचे रिपोर्ट नेगीटीव्ह आले होते. यानंतर रविवारी दुपारनंतर आलेल्या 5 जणांचे स्वॅब पैकी ता. 29 एप्रिल 2020 रोजी मुंबई अंधेरी येथील सहारगाव परिसरातून तळेघर येथे आलेल्या 28 वर्षीय तरुणाचा स्वॅब रिपोर्ट पॉजिटीव्ह आल्याने संपुर्ण यंत्रणेची धावपळ उडाली आहे. या घटनेची माहीती मिळताच प्रांताधिकारी शरद पवार यांनी मंडणगड येथे धाव घेतली. तसेच यंत्रणेच्या कामकाजाचे नियंत्रण करीत सूचना केल्या. संबंधीत तरुणाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर तिडे व तळेघर ही दोन्ही गावे सील केली आहेत.

याचबरोबर यंत्रणेने संबधीत रुग्णाच्या संपर्कात आलेल्या 7 नागरीकांना ग्रामिण रुग्णालय मंडणगड येथे आणून त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवून त्यांना इन्स्टिट्यूशनल क्कारंन्टाईन करुन ठेवण्यात आले आहे. हा तरुण 27 एप्रिल 2020 रोजी मुंबई सहारगाव येथून निघून पनवेल, महाड व महाडवरुन करंजाणी येथून त्याच्या तळेघर गावी आल्याचे प्रथमदर्शनी निर्दशनास आले. तो ज्या ज्या लोकांच्या संपर्कातून गावी पोहचला आहे. अशा व्यक्तींचा तपास पोलीस करत आहेत. याशिवाय गावच्या घरातील कुटुंबीय व नातेवाईकांची स्वॅब तपासणी व पुढील कारवाई करण्याचे निर्देश पोलीस यंत्रणेस देण्यात आले आहेत. यातील चार नातेवाईक मुंबई येथील असून त्यांची तपासणी व पुढील कारवाईसाठी मुंबईतील यंत्रणेस सुचीत करण्यात आले आहे.

दरम्यान संबंधीत रुग्ण हा आडवाटेने पायी चालत थेट घरी गेल्याने तळेघर गावातील 3 वाड्यातील 144 कुटुंबातील 318 व तिडे गावातील 318 कुटुंबातील 1307 नागरीकांचा तालुक्यातील अन्य गावापांसुनचा संपर्क पुर्णपणे बंद करण्यात आला आहे. तसेच संबंधीत तरुणास मंडणगडमधील ज्या क्कारंन्टाईन केंद्रामध्ये क्कारंन्टाईनकरुन ठेवण्यात आले होते. त्या केंद्रातील 29 क्कारंन्टाईन नागरीक व 6 कर्मचारी यांची स्वब तपासणी करण्यात येणार आहे. यापैकी 16 क्कारंन्टाईन नागरीकांचे स्वॅब यापुर्वीच निगेटीव्ह आले आहेत. तर 6 कर्मचाऱ्यांना इन्सट्युशनल क्कारंन्टाईन करण्यात आले असून त्यांचे स्वब तपासणीकरिता पाठवण्यात येणार आहेत. तसेच बाधित तरुणास कोरोना रोगाच्या लागणीचे वा कुठल्याही स्वरुपाचे आजाराची लक्षणे आढळून आलेली नाहीत. त्यास कळबणी उपजिल्हा रुग्णालय येथे आयसोलेशन सेंटरमध्ये भरती करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com